पीएम किसान सन्मान निधी व नमो शेतकरी योजनेचे ४००० उद्या जमा होणार वाचा सविस्तर

व्हाट्सअँप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

PM Kisan Samman Nidhi पी.एम. किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनांचे ऑगस्ट २०२४ ते नोव्हेंबर २०२४ मधील १८वा हप्ता आणि नमो शेतकरी चा ५व हप्ता PM Kisan Samman Nidhi and Namo Shetkari मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते दिनांक ०५ ऑक्टोबर, २०२४ रोजी सकाळी ११.०० वा. पोहरादेवी, ता. मानोरा, जिल्हा वाशिम येथील समारंभात वितरीत होणार आहेत.

शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न देण्याकरीता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी. एम. किसान) योजना माहे फेब्रुवारी, २०१९ पासून सुरु केली आहे.

या योजनेच्या निकषांनुसार सर्व पात्र शेतकरी कुटुंबास (पती, पत्नी व त्यांची १८ वर्षाखालील अपत्ये) रु. २०००/- प्रती हप्ता या प्रमाणे तीन समान हप्त्यात प्रती वर्षी रू. ६०००/- त्यांच्या आधार संलग्न सक्रीय बँक खात्यात लाभ जमा करण्यात येत आहे.

पी. एम. किसान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यात सन २०२३-२४ पासून नमो शेतकरी महासन्मान योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. पी. एम. किसान योजनेच्या १४ व्या हप्त्यापासून पुढील प्रत्येक हप्ता वितरणावेळी लाभ देण्यात आलेल्या राज्यातील पात्र शेतकरी कुटुंबांना या योजनेचा लाभ अदा करण्यात येत आहे.

महाराष्ट्र शासनाने २०२३-२४ व २०२४-२५ या आर्थिक वर्षात एकूण चार हप्त्यांमध्ये एकूण ९१.४५ लाख शेतकरी कुटुंबाना रक्कम रु. ६,९४९.६८ कोटी लाभ अदा करण्यात आला आहे. PM Kisan Samman Nidhi and Namo Shetkari

पी. एम. किसान योजना व नमो शेतकरी महासन्मान निधीच्या लाभ वितरण समारंभात https://pmindiawebcast.nic.in या लिंकआधारे सहभागी होण्यासाठी मा. श्री. धनंजय मुंडे, मंत्री कृषी यांनी राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना आवाहन केले आहे.

Leave a Comment