bajarbhaav

कापुस खर्च पाहता कापसाला 10 ते 12 हजार रुपये भाव असणे अपेक्षित आहे. परंतु मागील दोन वर्षांपासून 6500 ते 7500 रुपये भाव मिळत आहे. अनेक वेळा हमीभाव देखील मिळालेला नाही. त्यामुळे कापूस पिकाकडे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. कापुस लागवड क्षेत्र कमी झाले आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात अवकाळी पावसामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान देखील झाले आहे. मागील दोन वर्षांपासून कापूस भाव दबावात राहिल्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी अस्वस्थ झाले आहे. याहीवर्षी कापूस भाव कमी राहिले तर पुढील हंगामात कापूस लागवड मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते त्यामुळे कापूस भाव यंदा ठीक ठाक राहण्याची शक्यता आहे. कापुस भाव यंदा खरचं वाढतील का? आणि किती वाढतील? लगेच सांगता येणार नाही परंतु कापूस लागवड कमी आणि उत्पादनात घट